धांडे नगरात बंद घर फोडून साडेचार लाखांचे दागिने लंपास

रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रध्दा कॉलनीतील धांडे नगरात बंद घर फोडून घरातील ४ लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील श्रद्धा कॉलनीतील धांडे नगरात सतिष मोरेश्वर जोशी (वय-५२) हे वास्तव्यास आहे. ७ जुलै रोजी ते बडोदा येथे त्यांच्या काकांच्या भेटीसाठी गेले होते. तीन दिवस त्याठिकाणी राहिल्यानंतर ते नाशिक येथे शालकाकडे गेले. याठिकाणी त्यांनी पत्नी व मुलीला सोडून ते सोमवारी ११ जुलै रोजी सकाळी जळगावला परतले. त्यानंतर परस्पर ड्युटीवर निघून गेले होते. ड्युटी आटोपून रात्री ८ वाजेच्या सुमारास त घरी परतले असता, त्यांना घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप, सेंटरलॉक व कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घरात जावून पाहिले असता, त्यांना कपाटातील त्यांच्या बेडरुमधील असलेले फर्निचर दोन्ही कपाट उघडलेले होते तर त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता.

 

चोरट्यांनी कपाटात ठेवलेली सुटकेस देखील बेडवर फेकलेली होती. यात त्यांनी वडीलोपार्जीत व स्वकमाईने घेतलेले दागिने असा एकूण ४ लाख ६१ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी जोशी यांच्या तक्रारीवरुन मंगळवारी १२ जुलै रोजी सायंकाळी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.