पारोळ्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांना अभिवादन

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्या निमित्ताने श्री संत तुकाराम महाराज कुणबी पाटील समाज व सद्गुरु महिला उद्योग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

प्रथम कूणबी  पाटील समाजाचे पंच संजय पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री संत तुकाराम महाराज यांच्या कार्याविषयी तसेच कुणबी पाटील समाज यांच्याकडून होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी समाजाचे जेष्ठ पदाधिकारी देविदास पाटील यांनी श्री संत तुकाराम महाराज यांच्या विविध ओळीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती सांगितली. या अभिवादन कार्यक्रमास कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, सचिव शिवाजी गाडीवान, पंडित पाटील समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप पाटील, पत्रकार प्रतीक मराठे, सद्गुरू महिला उद्योगाच्या अध्यक्षा सुवर्णा पाटील यांच्यासह महिला व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.

शेवटी सुवर्णा पाटील यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सद्गुरु महिला उद्योग समाजाच्या पदाधिकारी यांनी सहकार्य केले. बीज सोहळ्यानिमित्त निमित्त पाणपोईचे उद्घाटन येथील अनुष्का डेअरीचे संचालक देविदास चैत्राम पाटील यांच्या संकल्पनेतून मनोज चैत्राम पाटील यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पालिका चौकात पाणपोई सुरू केली. दरम्यान हे पाणपोई अखंडित तिसरे वर्ष असून एक्वा चे पाणी नागरिकांना दिवसभर पुरविले जात.

Protected Content