मारूळ ग्रामपंचायतीचे स्वच्छता अभियानाकडे दुर्लक्ष

yawal photo

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील मारुळ गावी गेल्या काही महिने पासून स्वच्छता व मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याची तक्रार वारंवार करून देखील मारूळ ग्राम पंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या तक्रारीकडे कानाडोळा करीत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातुन संपूर्ण देशात युद्ध पातळीवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे, केंद्र सरकार या अभियांच्या यशस्वीते साठी कोटयावधी रुपयांचे खर्च जाहिरात करीता करीत आहे, असे असतांना तरी मारुळ या गावात अद्यापपर्यंत हे स्वच्छता का पहोचले नाही असा प्रश्न मारूळकरांना पडला आहे. मारूळ गावाला अनेक नागरी समस्यांनी त्रासले असुन, गावातील प्रमुख रस्ते व या मार्गावरील गटारी घाणीच्या पाण्यानी तुंबलेल्या असुन, पिण्याच्यासाठी लाखो रुपयांची पेयजल योजना ही कासवगती करण्यात येत असल्याने गावाला मुबलक पिण्याचे पाणी मिळत नसल्याने मोठया प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, रसत्यांची अवस्था अनेक वर्षापासुन जैसे थीच आहे, मारूळ गावाचा कुठलाही विकास होत नसल्याचे दिसुन येत आहे, गेल्या अनेक दिवसापासुन गावातील गटारी घाणीच्या दृर्गंधीयुक्त सांडपाण्यांनी तुबुंन भरलेल्या आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाचे सफाई कर्मचारीच्या माध्यमातुन गावात सफाईचे तिन तेरा झाले असुन, गटारींची होत नसल्याने गावात सर्वत्रडासांचा उद्रेक वाढला असुन या डासांचा उपद्रव वाढल्यामुळे अनेक आरोग्यांच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. तरी होणाऱ्या दुर्लक्षाकडे ग्रामपंचायतिने लक्ष द्यावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी मध्ये व्यक्त केली. यामुळे गावातील रहिवाश्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.  ग्रामसेवकाचे येण्याचे वेळ नाही. मारूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे वेळेवर हजर राहत नसल्याची देखील तक्रारी आहे. मारुळ गावामध्ये स्वच्छता अभीयानाचे पूर्णपणे तिन तेरा वाजले आहे. यासाठी मारूळ गावाचा वाली कोण? असा प्रश्न सामान्य ग्रामस्थांमध्ये पडला आहे.

Protected Content