मुक्ताईनगरात नऊ ट्रॉल्या निर्माल्याचे संकलन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी, ओम साई सेवा फाउंडेशन, नगरपंचायत मुक्ताईनगर व पोलीस प्रशासन मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ट्रॉल्या निर्माल्य संकलन करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री दीड वाजेपर्यंत निर्माल्य संकलनाचे काम सुरू होते.

मुक्ताईनगर येथील खामखेडा पुलावर दरवर्षी मुक्ताईनगर व आजूबाजूच्या तालुक्यातून हजारो गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी येत असतात. सोबतच दहा दिवसात जमा झालेले निर्माल्य ते नदीत टाकतात. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ओम साई सेवा फाऊंडेशनची संकल्पना असलेले निर्माल्य संकलनाचे कार्य मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीने पुढे नेत यावर्षीही नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने निर्माल्य संकलन केले आहे.

गेल्या वर्षी पाच ते सहा ट्रॉली भरून निर्माल्य संकलन करण्यात आले होते. यावर्षी नऊ ट्रॉल्या निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. नागरिकांनी गणेश विसर्जन करताना निर्माल्य दान करण्याचे आवाहन मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी ओम साई सेवा फाउंडेशन नगरपंचायत कार्यालय मुक्ताईनगर व पोलीस प्रशासन यांच्यातर्फे करण्यात आले होते.

Protected Content