अमळनेरात मोठ्या भक्तिभावाने बाप्पाला निरोप

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात आज अमळनेरात बोरी नदी काठावर आपल्या लाडक्या बाप्पा निरोप देण्यात आला. यावेळी गणेश भक्तांची अलोट गर्दी झाल्याचे दिसून आले.

शहरांत आज वाजत गाजत भक्ती पुर्ण वातावरणात गणेश मंडळातील तसेच घरगुती बसवलेल्या गणपती बाप्पा ना घेऊन भाविक आज सकाळ पासुनच बाप्पाला निरोप देत होते, त्यातल्या त्यात बच्चे कंपनीचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. बाप्पाला निरोप देते वेळी अनेक बाल गोपालांपासून ते वृध्दांपर्यत सर्वांचेच डोळे पाणावले होते. मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देऊन माघारी जात होते.

नगर पालिकेने देखील अनुचित प्रकार किंवा दुर्दैवी घटना घडू नये, म्हणून शहरात ठीक ठिकाणी मुर्ती तसेच निर्माल्य संकलन केंद्र उभारून सोय केली होती. भाविक देखील नदी पत्रात जाऊन पाण्यात मुर्ती बुडून परत पालिकेच्या संकलन केंद्रावर आणुन देत होते. त्यानंतर पालिका कर्मचारी संकलित केलेल्या मुर्त्या एकत्र ट्रॅक्टर मध्ये भरून देवळी येथील खदाणीत विसर्जनासाठी नेत होते.

पालिकेच्या या उपक्रमामुळे मूर्तींन मुळे नदीच्या जल प्रदूर्षणाला देखील आळा बसतो व मूर्तीची विसर्जना नंतरची भंगलेल्या मूर्त्यांची विटंबना देखील टळते त्यामुळे पालिकेच्या या उपक्रमांची नागरिकांन कडुन कौतुक केले गेले विसर्जन मार्गात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांन कडुन तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.आपले पोलिसांचे कर्तव्य पार पाडीत व सेवेतून थोडासा विसावा घेत विसर्जन नंतर अमळनेर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी बांधव यांनी नाचण्याचा मनमुरादपणे आंनद लुटला.

तसेच सकाळ पासुनच पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांरी देखील मोठी मेहनत घेतांना दिसत होते सायंकाळ पर्यत जवळ पास दोन हजार लहान मोठ्या गणेश मूर्तीचे संकलन पालिका कर्मचार्यांकडे झाले होते.

Protected Content