महापौरांच्या घरावर दगडफेक : रात्री उशीराची घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गणेश विसर्जनाची धामधुम सुरू असतांना रात्री उशीरा महापौर जयश्रीताई महाजन यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, काल रात्रीपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. यात रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मेहरूणमधील महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली. यासोबत या टारगटांनी घरावर गुलाल देखील फेकली. तसेच, यावेळी फटाक्यांचे बॉंब देखील फोडण्यात आले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, गोंधळ घालून टारगट तरूण पळून गेले. तर महापौर जयश्री महाजन यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगावच्या प्रथम नागरिकाच्या सुरक्षेबाबत असे घडत असेल तर इतरांचे काय असा प्रश्‍न उपस्थित करत त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. या प्रकरणी काही जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Protected Content