स्वच्छ भारत मिशन’ घोटाळ्याचा मास्टरमाईंड शोधा – बहुजन समाज पार्टीची मागणी

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी | ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत पंचायत समिती येथे दीड कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यात रावेर पोलीसात अगोदरच दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला मात्र या घोटाळ्याचा मास्टरमाईंड वेगळाच असून त्याचा शोध घ्या अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे.

ऑगस्ट २०२० ते २०२२ या दिड वर्षात ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत पंचायत समिती येथे दीड कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून दोन संशयीत कंत्राटी गट समन्वयक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र येथील कंत्राटी कामगार कोणत्या तरी राजकीय पक्षांच्या नेत्याच्या वरदहस्त असल्याशिवाय व प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीशवाय येवढा अपहार करणे शक्यच नाही. सदर कंत्राटी कामगार हे सन २०१२ पासून पंचायत समिती रावेर येथे नियुक्तीवर असल्याने यांच्या नियुक्ती पासून सखोल चौकशी झाल्यास हा अपहाराचा आकडा कोटींच्या घरात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं नमूद करत बहुजन समाज पार्टीने आमदार शिरीष चौधरी यांना एका निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली आहे.

त्यामुळे या घोटाळ्याचे मास्टरमाइंड, या आरोपीचे राजकीय गॉडफादर व खेड्यापाड्यातून प्रकरणे आणून देणारे एजंट यांचा गरीबांच्या शौचालयात अपहार करणाऱ्या खऱ्या चेह-यांचा पर्दापाश करण्यासाठी शौचालय घोटाळ्याची सन २०१२ पासून आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप सपकाळे, रावेर तालुका काँग्रेस अनु. जाती विभागाचे तालुकाध्यक्ष सावन मेढे यांनी आमदार शिरीष चौधरी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप साबळे, कॉग्रेस शहर उपाध्यक्ष संतोष पाटील, धुमा तायडे यांची उपस्थिती होती.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!