जळगावात रंगला भुलाबाई महोत्सव परितोषिक वितरण सोहळा

जळगाव, प्रतिनिधी | केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमीचा यावर्षीचा भुलाबाई महोत्सव ऑनलाईन साजरा झाला. यंदा या महोत्सवाचे १९ वे वर्ष होते. या उत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.

पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर जयश्री महाजन, भारतीय नौसेनेतील निवृत्त लेफ्टनंट कमांडर गुलबक्षी काळे, ललित कला अकादमीचे प्रमुख पियुष रावळ, केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संचालिका मनिषा खडके भुलाबाई महोत्सव प्रमुख मिनाक्षी जोशी उपस्थित होते.

मुख्य अतिथी महापौर जयश्री महाजन यांनी भुलाबाई उत्सवाचे कौतुक करुन स्त्रिया शिकल्या की त्यात्यांचे विश्व आपोआप निर्माण करतात, सर्वांनी एकत्र येऊन लोकपरंपरा व संस्कृती जतन करावी हा संदेश दिला. प्रमुख अतिथी गुलबक्षी काळे यांनी संरक्षण क्षेत्रात महिला कशा पद्धतीने काम करतात हा संदेश देत त्यांच्या लहाणपणीच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात भुलाबाईची आरती प्रांजली रस्से यांनी म्हटली. कार्यक्रमात गणेश वंदना शिवानी पाठक यांनी सादर केली. सुत्रसंचालन साक्षी पाटील व सेजल वाणी या सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यक्रम प्रमुख मिनाक्षी जोशी यांनी केशव स्मृती प्रतिष्ठानची लोकसंस्कृती जपण्याची भूमिका स्पष्ट केली.

ऑनलाईन कार्यक्रमात एकूण २० संघाचा सहभागघेतला. यात लहान गट ( ५ते १५ वर्ष ) प्रथम पारितोषिक : यति गट जळगाव, द्वितीय पारितोषिक – कात्यायनी गट जळगाव, तृतीय पारितोषिक : तुळशी गट खुला गट – प्रथम विजेते : सखी सहेली मंडळ जळगाव, व्दितीय विजेते : सखी गट नाशिक, तृतीय विजेते : सखी माऊली गट जळगाव, उत्तेजनार्थ बक्षीस चोपडा संघाने पटकावले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला व मुलीनी भुलाबाईच्या पारंपारिक लोकगीताचा समावेश भुलाबाई महोत्सवात केला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. अनघा गोडबोले (जळगाव ), शोभना भावे ( नाशिक), मिना सैंदाणे (जळगाव ), लिला गाजरे ( मुंबई ) यांनी ऑनलाईन केले. कार्यक्रमास केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड व सचिव रत्नाकर पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी भुलाबाई महोत्सव आयोजन समिती सदस्या प्रीती झारे, राजश्री रावळ, रेवती कुरंभट्टी, रेखा पाटील, रेवती शेंदुर्णीकर, अनिता वाणी, निवेदीता जोशी, सागर येवले, नितीन नेमाडे यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार गौरी ताम्हणकर यांनी मानले कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्यक म्हणून सुयोग गुरव यांनी व रोहन सोनगडा, गोपाळ तगडपल्लेवार यांनी सहकार्य केले.

 

Protected Content