महिला शक्ती केंद्र समितीच्या सदस्यपदी संदीप पाटील

यावल, प्रतिनिधी| तालुक्यातील डांभुर्णी येथील संदीप पाटील यांची महीला शक्ती केन्द्र समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे .

तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी व स्वंयदीप प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव तथा सामाजीक कार्यकर्ता संदीप निंबाजी पाटील यांची केंद्र शासन पुरस्कृत
बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय महीला समितीअंतर्गत महीला शक्ती केन्द्र समितीच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महीला शक्ती केंद्र निवड समितीत नोंदणीकृत अशासकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणुन त्यांची निवड करण्यात आली आहे. तर पाच सदस्य असलेल्या या समितीच्या सदस्य सचिवपदी जिल्हा महीला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांची निवड झाली आहे . त्याचबरोबर महीला विषय कार्यरत नोंदणीकृत अशासकीय संघटनेच्या प्रतिनिधी राजेश मनिषा खडके यांची तर सदस्यपदी नरेन्द्र बाळु पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

Protected Content