गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेतर्फे सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील गोदावरी लक्ष्मी कॉपरेटिव बँकेतर्फे  सभासदांना यंदा १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा चेअरमन डॉक्टर उल्हास पाटील यांनी केली. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेने आपल्या विश्वासार्ह कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

गोदावरी लक्ष्मी को-ऑपरेटिव बँकेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सरदार वल्लभभाइ पटेल सभागृहात उत्साह पूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे होते. तर व्यासपीठावर संचालक सुरेश झोपे, संगीता चौधरी, आशा तळेले, राजेंद्र कुरकुरे, राजेंद्र महाजन, डॉ. संपत वानखेडे, राजेंद्र पाटील, चंद्रकुमार चौधरी, डॉ. चंद्रसिंग पवार, लीलाधर चौधरी, सुनील महाले, हरीश फालक, श्रीमती गोदावरी पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाष पाटील,हृदयरोग तञ्ज डॉ वैभव पाटिल आदी उपस्थित होते.  बँकेचे कार्यकारी संचालक अशोक महाजन यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व  विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

 

 

एनपीएच्या प्रमाणात घट

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, बँकेच्या भागभांडवलात ३ लाख २५ हजार २०० रूपयांची वाढ झाली असून ते ५ कोटी ७१ लाख ७५० इतके झाले आहे. बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमार १.१८ टक्के आहे. बँकेच्या स्वनिधीतही ३५.४७ लाख इतकी वाढ झाली आहे. वैधानिक लेखापरीक्षणात गोदावरी बँकेला सभासदांच्या विश्‍वासामुळे सतत ऑडीट वर्ग अ मिळणे ही अभिमानास्पद बाब असल्याचेही डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. यंदा बँकेला निव्वळ नफा १ कोटी १० लाख रूपये इतका झाला असून बँकेच्या ठेवींमध्येही वाढ झाली आहे. भविष्यातील आर्थिक आव्हाने लक्षात घेता गोदावरी बँकेने आत्तापर्यंत नेहमीच सभासदांच्यादृष्टीने सर्वोत्तम कारभार केला असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

 

 

सभासद पाल्यांचा सत्कार

गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  सभासद पाल्यांचा चेअरमन डॉक्टर उल्हास पाटील यांच्यासह मान्यवर संचालक मंडळाच्या हस्ते   आणि पीएचडी पदवीधारक यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार समारंभाचे वाचन बँकेच्या वरीष्ट अधिकारी राजश्री महाजन यांनी केले. सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बँकेचे कार्यकारी संचालक अशोक महाजन यांनी केले. तर आभार बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी बँकेचे अधिकारी, कर्मचारी व स्टाफने परिश्रम घेतले. राष्ट्रागीताने सभेचा समारोप करण्यात आला.

Protected Content