फुले मार्केट परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केट परिसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १८ ऑगस्ट रोजी नातेवाईकांसह अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात आले होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याचे प्रकार उघडकीला आला. तिच्या नातेवाईकांनी संपूर्ण फुले मार्केट परिसर पिंजून काढला.

परंतु मुलगी कुठेही मिळून न आल्याने अखेर त्यांनी शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भदाने करीत आहे.

Protected Content