एरंडोलजवळील भीषण अपघातात 9 ठार तर 10 जखमी (व्हिडीओ)

web news 1

एरंडोल/जळगाव प्रतिनिधी । एरंडोल पासून 5 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हॉटेल गौरी जवळ 23 डिसेंबर सोमवार रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास काली पिली व ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन घटनास्थळी 9 जण ठार झाले असून 10 जाण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातात एरंडोल येथील 5 जणांचा समावेश असल्यामुळे शहरात सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव येथून काली पिली क्रमांक (एमएच 19 वाय 5207) ही प्रवासी घेऊन एरंडोलकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हॉटेल गौरी जवळ एरंडोलकडून जळगावकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघातामुळे काली पिली अक्षरशहा पलटी झाली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात अनेक जण विव्हळत पडले होते. अपघातात कालीपिली अक्षरशहा चुराडा झाला होता.

अपघातात मृत झालेल्यांची नावे
प्रसन्ना निवृत्ती वंजारी (वय-10), निवृत्ती प्रभाकर वंजारी (वय-45), परमेश्वर नाना जाधव (वय-23), काली पिली चालक नितीन (पिंटू) सोनार (वय-42), काशिनाथ शंकर पाटील (वय-60), उज्वला निवृत्ती वंजारी (वय 38), भानुदास माधव जाधव रा. एरंडोल. अन्य दोन जणांची ओळख पटली नाही.

जखमींची नावे
अनुसयाबाई, तुळसाबाई संजय महाजन, गिताबाई मधुकर देशमुख, विजयानंद आनंदा सोनवणे (वय-20), राजेंद्र आनंदा सोनवणे (वय-22) दोघे रा. जावखेडा ता.एरंडोल, दुधभानसा खुसराम (वय-26), फुसीयाबाई सुरेशकुमार (वय-45) दोन्ही रा. सोंधनी छिंदवाडा, मध्यप्रदेश, मिठाराम श्रावण आरखे (वय-42) रा. शहापूर ता. जामनेर, नरेंद्र भिका कासार, यासीन खान पठाण, सोईल शेख, पुष्‍पाबाई महाजन यांचा समावेश असून अपघातात दैव बलवत्तर म्हणून म्हणून 6 वर्षाची बालिका सिमरन दुधभानसा खुसराम (वय-3) रा. सोंधनी छिंदवाडा, मध्यप्रदेश ही सुखरूप बचावली असून कोणतीही जखम झालेली नाही.

एरंडोल पोलीसांची धाव
अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक अरुण हजारे, एपीआय तुषार देवरे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते, निलेश ब्राह्मणकर, अखिल मुजावर, भाजपाचे उत्तर संघटन मंत्री महाराष्ट्र किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, नगरसेवक मनोज पाटील, उपनगराध्यक्ष बबलू चौधरी, माजी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, पराग पवार, तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन, नगरसेवक अस्लम पिंजारी, ॲड.अहमद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी परिश्रम घेतले.

रस्त्यांच्या कामांबाबत शासनाची कुंभकर्णी झोप
चौपदरीकरणाच्या संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे रोज अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहे. मात्र तरीदेखील शासन कुंभकर्णी झोप घेत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे.

अम्बुलन्सचा दरवाजा लॉक
दरम्यान या अपघातातील गंभीर जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता, आणणाऱ्या अम्बुलन्स क्रमांक एमएच 19 सीएल 0543 या गाडीचा दरवाजा रुग्णालयाजवळ आल्यावर लॉक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे नागरीकांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात बांधकाम सुरू असल्याने लोखंड कापण्याच्या कटरने तोडून जखमींना बाहेर काढून तीन गंभीर जखमींना उपचारार्थ दाखल केले आहे. पण या सगळ्या प्रकारात अक्षम्य असा एक तासांचा उशीर झाला. यावेळी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात जखमींना आणल्यानंतर उपस्थित तरूणांनी तातडीने धाव घेत रूग्णालयात जखमींना नेण्यासाठी मदत कार्य सुरू होते. यावेळी मन हेलावणारी दृश्ये पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होते.

Protected Content