बालसुधारगृहातील १० वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक अत्याचार

जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय बालसुधार गृहात एका १० वर्षीय मुलावर १३ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शासकीय मुलांचे बालसुधार गृह हे जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. येथे १० वर्षीय बालक वास्तव्याला आहे. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १० वर्षीय बालक झोपलेला असतांना सोबत राहणारा १३ वर्षीय मुलाने त्याला झोपेतून उठवून वरच्या मजल्यावर नेले. तिथे बाथरूमच्या समोरील जागेत त्याला लाथ मारून खाली पाडले व त्याच्या सोबत अनैसर्गिक कृत्य केली. हा प्रकार कुणाला सांगितला तर मारहाण करण्याची धमकी दिली. बालसुधारगृहाचे अधिक्षक रविकिरण अहिरराव यांनी पिडीत बालकाला विश्वासात घेवून चौकशी केली असता घडलेला प्रकार त्याने कथन केला. यानंतर बुधवार १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बालसुधारगृहाचे अधिक्षक रविकिरण अहिरराव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख करीत आहे.

Protected Content