धावत्या रेल्वेतून पडल्याने महिला अत्यवस्थ

Railway news

जळगाव प्रतिनिधी । रेल्वेतून रात्री प्रवास करणाऱ्या 37 वर्षीय विवाहितेचा तोल जावून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाल्या असून नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीरभाई अंबादास भटकर (वय- 40) रा. थिलोरी ता.दर्यापूर जि. अमरावती ह.मु. गोंडल जि. राजकोट (राजस्थान) हे आपल्या पत्नी रसीलाबाई सुधीरभाई भटकर (वय- 33) आणि दोन मुलांसह मुळ गाव थिलोरी येथे आईला भेटण्यासाठी गेले होते. शनिवारी रात्री 9.30 वाजता राजकोटकडे जाण्यासाठी मुर्तीजापूर येथून हावडा-पोरबंदर एक्सप्रेसमध्ये बसले. रात्री 11.45 वाजेच्या सुमारास रसीलाबाई टायलेटला जात असतांना बोगीच्या दरवाजाजवळ आल्या, त्यावेळी भरधाव रेल्वे गाडी वळणावर आल्याने विवाहितेचा तोलजावून खाली पडल्या. विवाहिता खाली पडता काही प्रवाश्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीन चैन ओढून रेल्वे थांबविली. ही घटना भुसावळ – भादली दरम्यान घडली. रेल्वे थांबविल्यानंतर सुधीरभाई आणि दोन्ही मुले खाली उतरून पत्नी रसीलाबाई यांना शोधण्यासाठी निघले. थोड्यावेळी रेल्वे पोलीस व गार्ड यांनी घटनास्थळी धाव घेवून त्यांना मदत केली. एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर विवाहिता गंभीररित्या जखमी आवस्थेळ आढळून आल्या. त्यांना तातडीन रात्री 1.30 वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content