गौतम गंभीरला जिवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | माजी क्रिकेटपटू तथा भाजपचे खासदार गौतम गंभीर यांना इसीस काश्मीर या दहशतवादी संघटनेने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांना धमकीचा मेल आला. त्यानंतर गंभीर यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करण्यात आली आहे. गंभीर यांना इसीसकश्मीरफ ने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी मिळाल्याची माहिती मिळताच डीसीपी श्वेता चौहान यांनी तात्काळ तपास प्रक्रिया वेगानं सुरू केली आहे. डीसीपी श्वेता चौहान म्हणाल्या की, मगौतम गंभीर यांना धमकी मिळाली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर यांनी राजकारणात प्रवेश केला. आपल्या बेधडक वक्तव्यामुळे गौतम गंभीर नेहमीच चर्चेत असतात. प्रसारमाध्यमांत अथवा सोशल मीडियावर गौतम गंभीर आपलं मत व्यक्त करत असतात. दहशतवादाविरोधात गौतम गंभीर यांनी परखड मतं व्यक्त केली आहेत. त्यामुळेच त्यांना हा धमकीचा मेल आल्याचे मानले जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!