बजरंग बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । बजरंग बोगद्या जवळील प्रेम नगराजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ५९ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संजीव वसंत खडके (वय-५९) रा. लक्ष्मी नगर, प्रेमनगर जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. नेहमप्रमाणे आज बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी सुमारास फिरायला बाहेर पडले. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास रेल्वे पटरी ओलांडत असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रेल्वे खंबा क्रमांक ४१८ अपलाईनवर घडली. घटनेची माहिती मिळताच जळगाव रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल सचिन भावसार करीत आहे.  मयत संजय खडके यांच्या पश्चात पत्नी , आई , एक मुलगा , सून , नातू असा परिवार आहे .

 

Protected Content