छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रेल्वेतील प्रवाशांचे ऐवज हिसकावणाऱ्या तीन गुन्हेगारांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे गुन्हे आरोपींनी नांदेड आणि परळी लोहमार्ग हद्दीत केले आहेत. आरोपींकडून पावणे नऊ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांच्या स्वाधीन केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड आणि परळी लोहमार्गावर सातत्याने रात्रीच्या सुमारास रेल्वे क्रॉसींगसाठी थांबल्यानंतर खिडकीतून हात घालून प्रवाशांचे दागिने पळवण्याच्या घटना घडत होत्या. या प्रकरणी परळी आणि नांदेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यामध्ये योगेश नबीलाल काळे, दिपक नबीलाल काळे आणि परदेश दगडू भोसले यांचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी पाच गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून पावणेनऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.