Home क्राईम तरुणाचे बंद घर फोडून ७३ हजार २०० रुपयांचा ऐवज लांबविला

तरुणाचे बंद घर फोडून ७३ हजार २०० रुपयांचा ऐवज लांबविला

0
42


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी गावात तरुणाचे बंद घर फोडून घरातून ७३ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी १७ मे रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशपाक एलियन्स मणियार वय-३३, रा. वाघळी ता. चाळीसगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. इलेक्ट्रिक काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. गुरुवार १६ मे रोजी रात्री ८.३० ते शुक्रवार १७ मे रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाटातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ७४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर अशपाक मणियार याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जयेश पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound