दुचाकी अपघातात जखमी झालेल्या माजी मुख्याध्यापकाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील माजी मुख्याध्यापक के.ए.तायडे यांचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता घडली. याप्रकरणी यावल पोलीसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, शहरातील बोरावल गेट परिसरात राहणारे साने गुरूजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.ए. तायडे हे बुधवार १७ एप्रील रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्यांच्याकडील दुचाकीने टेलीफोन एक्सचेंज परिसरातून जात असतांना समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एम एच १४ के एफ १४७०) ने दिलेल्या धडकेत माजी मुख्याध्यापक तायडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या प्रथम उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असता उपचारा दरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

Protected Content