भरसभेत कन्हैया कुमारवर भिरकावली चप्पल

kanhaiya kumar

 

पाटणा (वृत्तसंस्था) बिहारमध्ये पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमारवर भरसभेत एका तरुणाने चप्पल भिरकावली. दरम्यान, ‘जन गण मन’ यात्रा सुरु केल्यानंतर कन्हैया कुमारवर ८ वेळा हल्ला करण्यात आला आहे.

 

कन्हैया आपल्या पूर्वनिर्धारीत कार्यक्रमासाठी गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत दाखल झाला होता. मंचावरून कन्हैया बोलत असताना एका तरुणाने त्याच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अपयशी ठरला आणि चप्पल मंचापर्यंत पोहचू शकली नाही. परंतु, सीपीआय कार्यकर्त्यांनी मात्र चप्पल भिरकावणाऱ्या तरुणाला पकडून बेदम चोप दिला. कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर पोलिसांनी गर्दीपासून बाजुला करत या तरुणाला ताब्यात घेतले. या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाचे नाव चंदन कुमार असे आहे. कन्हैया कुमार देशात दंगे पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, असे चंदनचे म्हणणे आहे. आपण देशभक्त असल्याचेही चंदन म्हणतोय.

Protected Content