टायगर गृप खान्देशच्या नावाचा गैरवापर केल्यास हाकलपट्टी करणार- ऋषीकेश भांडारकर

जळगाव प्रतिनिधी । टायगर ग्रुप समाजसेवेची करणाऱ्या तरुणाचे व्यासपीठ आहे. टायगर गृप ही  कुठलीही राजकीय संघटना नाही. त्यामुळे टायगर गृप खान्देशच्या नावाचा गैरवापर करून जनतेत दशहत निर्माण करत असल्याचे निदर्शनास येत आहे. टायगर गृपच्या नावाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास त्या सदस्याची हाकलपट्टी करण्यात येईल असा इशारा टायगर गृप खान्देश अध्यक्ष ऋषीकेश भांडारकर यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

टायगर गृपमध्ये जो काम करतो तोच खरा टायगर असेल. सामाजिक कामे, रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना मदत करणे, दवाखान्यामध्ये रुग्णांना मदत करणे, व्यायाम शाळा चालविणे, गरजू कुटुंबाच्या अडचणी सोडवणे यासह इतर सामाजिक उपक्रम राबविण्यात येते. असे विविध उपक्रम ग्रुपकडून सुरू असतात. तरी जळगाव जिल्ह्यात तसेच खानदेशात ग्रुपचे सक्रिय कार्यकर्ते असून कुठल्याही प्रकारे गुन्हेगारी स्वरूपाचे कामे केली जात नाही, तरी काही तरुण हे टायगर ग्रुपच्या नावाखाली दहशत निर्माण करत आहे. टायगर ग्रुपच्या अशा कोणत्याही व्यक्तीचे किंवा गटाचे समर्थन करून नाही तसेच टायगर ग्रुपचे खानदेशात फक्त एकच पद जाहीर आहे आणि ते फक्त आणि फक्त खान्देश अध्यक्ष जर जनतेला कुठल्याही प्रकारे पद सांगून धमकावत असेल किंवा आपली दहशत निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. असे प्रकार समोर आल्यास संबंधित सदस्य आणि व्यक्तीला टायगर गृपमधून हाकलपट्टी करण्यात येईल. तसेच समाजात टायगर गृपची बदनामी करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल यासाठी संपर्क साधावा असे आवाहन गृपचे खान्देश अध्यक्ष ऋषीकेश भांडारकर यांनी केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!