Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यातील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारुन जीवन यात्रा संपवली

अमळनेर तालुक्यातील कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारुन जीवन यात्रा संपवली

0
1

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 27) उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून शेतीतील आर्थिक अडचणी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकट ऐरणीवर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेडी येथील श्याम सुनील पाटील (वय 32) यांच्याकडे सुमारे दीड एकर शेती होती. शेतीवर अवलंबून असलेल्या श्याम यांच्यावर अंदाजे तीन लाख रुपयांचे खासगी कर्ज असल्याचे सांगितले जात आहे. यंदाच्या खरीप हंगामातही अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी असल्याने आर्थिक विवंचना अधिक तीव्र झाली होती. या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, श्याम पाटील हे शनिवारी (दि. 26) रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

शवविच्छेदनानंतर दुपारी सुमारे अडीच वाजता श्याम पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

श्याम पाटील यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ता तरुण गमावल्याने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. अंत्यसंस्कारावेळी वडील सुनील विनायक पाटील यांचा आक्रोश उपस्थितांच्या मनाला चटका लावणारा होता. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Protected Content

Play sound