सात्री येथे भीषण अग्नीतांडव : गोठ्यासह घरे व किराणा दुकान खाक !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सात्री येथे आज रात्री भयंकर आग लागली असून यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील सात्री येथे आज रात्री भीषण आग लागली. पहिल्यांदा ही आग गोठ्याला लागली असून नंतर शेजारच्या घरांना आगीने ग्रासल्याचे दिसून आले. यात घरांसह एका किराणा दुकानाचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीने विक्राळ स्वरूप धारण केल्यामुळे सात्री येथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळालेले नव्हते.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, मुख्याधिकारी तुषार निमकर यांनी अमळनेर येथून दोन अग्नीशामक दलाच्या बंबांना रवाना केले आहे. तर अन्य ठिकाणांहून देखील बंबांना बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.

Protected Content