एरंडोल, प्रतिनिधी । येथील कोविड सेंटरला अतिरिक्त पाच ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी स्वराज्य फॉउंडेशन मित्र परिवार यांच्यातर्फे आज रोख ७१ हजार रुपयांची मदत प्रांत विनय गोसावी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
एरंडोल कोविड सेंटर मधून ऑक्सिजनच्या कमतरते मुळे पेशंट जळगांव पाठवावे लागत असल्याने प्रांत विनय गोसावी यांनी ऑक्सिजन बेडसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत स्वराज्य फॉउंडेशन मित्र परिवाराचे पदाधिकारी प्रा.मनोज पाटील,तुषार अँग्रो सेल्सचे संचालक तुषार मोने, जय बजरंग ट्रेडर्सचे संचालक महेंद्र चौधरी, अरिहंत मोबाईल्सचे संचालक सचिन जैन, ठाकूर कलेक्शनचे संचालक दिपेश ठाकूर, मे.दगडूसेठ देवरे ज्वेलर्सचे संचालक महेश देवरे, चंद्रकांत पारखे, राहुल शिंपी, गव्हरमेंट कॉन्ट्रॅक्टर सुनील पांडुरंग चौधरी, श्रद्धा फोटोचे संचालक नितीन महाजन, पांडव ट्रेडर्सचे संचालक दिपक चौधरी, पत्रकार पिंटू राजपूत, राम ठाकूर, अमोल जाधव, सुनील तायडे, प.स.सदस्य विवेक पाटील, बाजीराव पांढरे,अशोक भवार,या सर्व मित्र परिवाराने ७१ हजार रुपयांचा निधी जमवून प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. ऑक्सिजन बेडसाठी आमदार निधीतून सुद्धा २० बेडचे काम सुरू आहे. अतिरिक्त ५ ऑक्सिजन बेड ची तयार करणेकामी ही मदत स्वराज्य फॉउंडेशन तर्फे करण्यात आली.