सी. बी. निकुंभ विद्यालयाचा बारावीचा ७२ टक्के निकाल

चोपडा,प्रतिनिधी । तालुक्यातील घोडगाव येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सी. बी. निकुंभ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल ७२% लागला आहे.

चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली. परीक्षेत प्रविष्ट ६७ पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्वप्रथम आलेल्या तीन ही विद्यार्थिनी असून प्रथम अश्विनी रामचंद्र कोळी ७८.१५%, द्वितीय जयश्री देविदास कोळी ७५.८५%, तृतीय मुस्कान जुम्मा खाटीक ७१.८५% अशी टक्केवारी प्राप्त झाली. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर पी चौधरी, पर्यवेक्षक एस बी अहिरराव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

Protected Content