दूध आंदोलनाला राज्यात ठिकठिकाणी सुरुवात ; सरकारचा तीव्र निषेध !

अहमदनगर (वृत्तसंस्था) दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभरात दूध आंदोलनाला सुरुवात केली आहे.

 

अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार, असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

Protected Content