शिरवेल येथील प्रसिद्ध महादेव दर्शन राहणार बंद; ग्राम प्रशासनाचा निर्णय

जळगाव प्रतिनिधी– मध्यप्रदेशातील खरगोन जिल्यातील सुप्रसिद्ध शिरवेल चा महादेव येथे श्रावण महिन्यात महाराष्ट्र तसेच विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात.या वर्षी श्रावण महिन्यात शिरवेल महादेव यात्रा व महादेवगर्भ ग्राम प्रशासनातर्फे प्रतिबंद करण्यात आले आहे.

देशात आणि महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीचे वाढते प्रमाण पहाता महाराष्ट्रसह इतर ठिकाणाहून येणाच्या शिवभक्तांना यावर्षी श्रावण महिन्यात शिवदर्शन करता येता येणार नाही, असा निर्णय शिरवेल देवस्थान आणि ग्रामपंचायततर्फे घेण्यात आला असून अशी सूचनाही माध्यमांना देण्यात आली आहे. दर वर्षी श्रावण महिन्याच्या सुरवातीपासून दर सोमवारी महाराष्ट्रातून हजारो भाविक पालमार्गे शिरवेल येथे दाखिल होत होते.परंतू या वर्षी शिवदर्शनापासून आणि सातपुड्याच्या निसर्गसौदर्यापासून महाराष्ट्रातील भाविकांना वंचित रहावा लागणार आहे.सदर महादेवाचे मंदिर हे डोंगराच्या कपारीत असून तिथे जाण्यासाठी लोखंडी शिडी आहे. महाराष्ट्र राज्यातून येणारे सर्व मध्यप्रदेश रस्त्यावर ग्राम समितीतर्फे सुरक्षा वाढविण्यात आली असून गाड़ऱ्या जामन्या या महाराष्ट्र सीमेवर लंगडाआंबा येथील युवकांची तेथे नेमणूक करण्यात आली आहे. ते महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांना समजूत घालून परत पाठवणार आहेत.

कोरोना महामारीचा वाढते प्रमाण पहात आम्ही शिरवेल ग्रामपंचायततर्फे शिरवेल महादेव दर्शन बंद करण्यात आला आहे तसेच ग्राम कोरोना समितीतर्फे प्रमुख मार्गावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. यावर्षी शिरवेल येथे येणाऱ्या सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करावे , यावर्षी शिरवेल महादेव दर्शनाला कोणीही येऊ नये असे आवाहन रेवलसिंग दुडवे सरपंच यांनी केले आहे.

Protected Content