जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा – राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाची मागणी

धरणगाव प्रतिनिधी । इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या अवमान केल्याबद्दल त्रिपुरा सरकार तात्काळ बरखास्त करण्यात येवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीचे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष नगरभाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव पोलिस ठाण्यात व तहसिल मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी पोलिस निरीक्षक शेळके व नायब तहसिलदार जे.पी.भट यांना निवेदन सादर प्रसंगी सांगितले की, उत्तरप्रदेशात वसीम रिजवी याने हजरत मोहम्मद पैगंबर व पवित्र कुराण संदर्भात टिप्पणी केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून समाजात जातीय तेढ निर्माण करणारा वसीम रजवी याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, व इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचे अवमान करणारे त्रिपुरा सरकार बरखास्त करण्यात यावे. मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर व समाजातील धार्मिक स्थळांची तोडफोड व विडंबना केली जात आहे. असे प्रकार करणारे समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात यावे. तसेच, काल रोजी महाराष्ट्रात नांदेड, अमरावती व मालेगाव येथे त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटले, व ज्या समाजकंटकांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, असेही श्री.वाघ यांनी सांगितले.

निवेदन सादर प्रसंगी मुस्लिम मोर्चा तालुकाध्यक्ष नगरभाई मोमीन, सिराज कुरेशी, निलेश पवार, आकाश बिवाल, गोरखनाथ देशमुख, गौतम गजरे, लक्ष्मणराव पाटील, विनोद चव्हाण, बापू मोरे, महेंद्र तायडे, सुनील लोहार, गजानन माळी, इस्माईल, कलीम, जाकीर, जैनुल आबोद्दीन, मो.रिझवान, मो.दानिश, मो.शफी, मो.अल्ताफ, निसार अहेमद, प्रदीप पगारे सह धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोना. मिलिंद सोनार, पोकॉ.वैभव बाविस्कर, विनोद संदानशिव, शामराव भिल, पोना.चालक गजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content