अखेर वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र : विजयी मेळाव्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एल्गार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून असलेला शिवसेना-उबाठा व मनसेचा एकत्र विजयी मेळावा आज पार पडला असून यात तब्बल वीस वर्षानंतर उध्दव आणि राज हे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र आले असून याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली आहे.

मराठी भाषेच्या मुद्यावरून उध्दव व राज ठाकरे यांचा सूर जुडल्याचे दिसून आले. यातच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रक्रियेला वेग आला. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना-उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. अनेक ठिकाणी त्यांनी एकत्रीत आंदोलने देखील केलीत. दरम्यान, राज्य सरकारने हा निर्णय स्थगित करत याबाबत समितीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. ठाकरे बंधूंनी या निर्णयाचे स्वागत करत याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आज वरळी डोम येथे विजयी मेळाव्याचे आयोजन केले.

दरम्यान, आज हा मेळावा अतिशय उत्साही वातावरणात सुरू झाला. भरत जाधव व तेजस्विनी सावंत यांच्या सारखे सेलीब्रीटी देखील यात सहभागी झाले. तर शिवसेना-उबाठा व मनसेचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रीया सुळे, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर,रासपचे महादेव जानकर यांनी देखील या मेळाव्यात सहभाग घेतला.