नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो कुवेतविरूध्द ६ जून रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप चांगली राहिलेली आहे.
सुनील छेत्रीने भारतासाठी १४५ सामने खेळले. 20 वर्षांच्या या कारकिर्दीत त्यांनी ९३ गोल केले. पण त्याने आता निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत सुनील छेत्रीने निवृत्तीची घोषणा केली. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, असं म्हणत सुनील छेत्रीने जवळपास ९ मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
प्रसिध्द फुटबॉलपटू सुनील छेत्रीने केली निवृत्तीची घोषणा
8 months ago
No Comments