समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा निर्णय

balasaheb thakre

 

मुंबई (वृत्तसंस्था) नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. पुढची कारवाई पूर्ण करुन मागणी पूर्ण केली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपाचा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील पहिल्या वहिल्या मुंबई— पुणे द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढही बाळासाहेबांनी रोवली होती. त्यामुळे देशातील या पहिल्या द्रुतगती महामार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाचा, त्यांच्या दूरदृष्टीचा यथोचित सन्मान व्हावा यासाठी समृद्धी महामार्गास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी या आधीही शिवसेनेने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

Protected Content