धक्कादायक ! शालेय पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळया

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवतमाळ जिल्ह्यात शालेय पोषण आहारासंदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चॉकलेटचे वितरण करण्यात आले होते. परंतू मुलांना दिलेल्या मिलेट्स चॉकलेटमध्ये चक्क अळया अळया आढळल्या. यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन वादाच्या भोवऱ्या आले आहे. कंपनीने पाठवलेल्या या तीनही चॉकलेटला कुठल्याही प्रकारची चव नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चॉकलेट व्यवस्थित राहावे त्यासाठी कुठलीही शितपेटीची व्यवस्था नाही. चॉकलेटची गुणवत्ता अतिशय खालच्या दर्जाची आहे.
त्याच्यावर किंमत देखील नाही. तालुक्यातील बऱ्याच गावातून चॉकलेट खाल्ल्यानंतर त्रास होत असल्याच्या तक्रारी केंद्रप्रमुखांकडे प्राप्त झाल्या होत्या. परंतु चॉकलेट लवकरात लवकर वाटून संपवा असा आदेश वरिष्ठांकडून आल्यामुळे मुख्याध्यापक मोठ्या अडचणीमध्ये सापडले आहेत. चातारी प्राथमिक मुलींची कन्या शाळेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वाटपाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एकूण 95 पालकांपैकी 65 पालकांनी शालेय पोषण आहार घेतला. त्यांनी चॉकलेट घरी नेले त्यापैकी 25 पालकांनी चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या आळ्या असल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्व पालकांना धक्का बसला. पालकांनी मुख्याध्यापकांना हे चॉकलेट परत आणून दिले.

Protected Content