इंडिया आघाडीचे सरकार आल्यास बाहेरून पाठिंबा देऊ – ममता बॅनर्जी

कोलकाता-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांचा पक्ष इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा देईल, अशी मोठी घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने इंडिया आघाडीला आपला जाहीर पाठींबा दिला असल्याचे सांगितले होते. पण ऐन लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीतच ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीसोबत काडीमोड घेत, पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेससोबतच्या जागावाटपावर असहमती दर्शवतली होती.
ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, इंडिया आघाडीच्या स्थापनेत मी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विरोधी पक्षांच्या युतीचं नावंही मीच दिलेलं होतं. पण इथे पश्चिम बंगालमध्ये सीपीआय (एम) आणि काँग्रेस भाजपसाठी काम करत आहेत. मात्र आता ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका बदलली आहे. त्या एका कार्यक्रमात म्हणाल्या की, मी दिल्लीतील इंडिया आघाडीबाबत बोलते आहे. यामध्ये सीपीएम किंवा बंगाल काँग्रेस सहभागी नाही. त्यांचा पक्ष केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी इंडिया ब्लॉकला पाठिंबा देईल. ममता बॅनर्जी यांनीही नागरिकत्व कायदा रद्द करण्याची शपथ घेतली. त्या म्हणाल्या की, भाजप सरकार सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि समान नागरी संहिताची अंमलबजावणी थांबवली जाईल.

Protected Content