नितीशकुमार यांची नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांचा जुने गडी, जुनाच डाव पाहायला मिळाला आहे. नितीशकुमार यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

या टर्ममधील त्यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही तिसरी वेळ आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी नितीशकुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चौधरी शपथ घेण्यासाठी आले असता यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.

Protected Content