टी-२० वर्ल्डकपचा विचार आतापासून करण्याची गरज नाही – गांगुली

sourav ganguly

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा विचार आतापासून करण्याची गरज नाही. गेल्या वर्ल्डकप स्पर्धेआधीही यावर खूपच चर्चा झाली होती आणि कधी-कधी हे संघासाठी योग्य नसते, सध्यातरी उत्तम संभाव्य खेळाडूंची निवड करावी, त्यांना उत्तम कामगिरी करण्याची भरपूर संधी देण्यावर भर द्यावा, असे मत गांगुली यांनी व्यक्त केले आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजा यांनी त्यांच्यातील क्षमता दाखवून दिली आहे. आता युवा खेळाडूंनी पुढे येऊन क्षमता दाखवण्याची गरज आहे. आपल्याकडे उत्तम गोलंदाज आहेत. खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी आदी दमदार खेळाडू आहेत. टीम इंडियानं त्यांना जपायला हवं. बुमराहसारखे त्यांनीही स्वतःमध्ये चांगले बदल करावेत, असं गांगुली म्हणाला. फलंदाजीतही काही युवा खेळाडू आपलं स्थान मिळवण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसे स्वातंत्र्य द्यायला हवे. वेस्ट इंडीजमध्ये वनडे सामन्यांत श्रेयस अय्यरनं उत्तम फलंदाजी करून स्वतःला सिद्ध करून दाखवलं, त्याची टी-२० संघात निवड करून बक्षिस देण्यात आलं, असेही ते यावेळी म्हणाले आहे.

Protected Content