राष्ट्रीय फिनस्विमिंग जलतरण स्पर्धेत ऋतुजाची चमकदार कामगिरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील इयत्ता नववीची विद्यार्थीनी ऋतुजा हर्षल भंडारी हिने नुकतेच उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मोठे यश संपादन केले.

 

ऋतूजा हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत असून 4×50 या मिक्स रिले प्रकारात रौप्य पदक तर २०० मीटर या प्रकारातही कांस्य पदक मिळवत राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या अनुशंगाने विजयी ठरलेल्या ऋतुजा भंडारी हिचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांचे या विध्यार्थिनीला मार्गदर्शन लाभले.

Protected Content