एपीआय सचिन वाझे यांना अटक

मुंबई प्रतिनिधी । मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

एपीआय सचिन वाझे यांना एनआयए कडून अटक करण्यात आलीय. शनिवार (13 मार्च) सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11.30 वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, अखेर 13 तासांच्या चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आलीय.

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

सचिन वाझेंवर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी देखील आरोप होत आहेत. त्यापैकी एनआयए सध्या अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास करत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार एनआयएने अंबानी स्फोटक प्रकरण राज्याकडून आपल्याकडे हस्तांतरीत केलंय. याच प्रकरणी एनआयए कसून तपास करतेय. एनआयएने सचिन वाझेंवर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

Protected Content