रस्त्यासाठी लोटांगण…यापुढे आत्महदनाचा शिवसैनिकाचा इशारा !

बोदवड प्रतिनिधी । बोदवड ते साळशिंगी रस्ता इशारा देऊनही तयार न करण्यात आल्याने विनोद पाडर या शिवसेनेच्या पदाधिकार्‍याने लोटांगण आंदोलन केले. तर याची दखल न घेतल्यास रस्त्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा आता त्यांनी दिला आहे.

बोदवड तालुक्यातील बोदवड ते साळशिंगी या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याबाबत दखल घेण्यात आली नसल्याने शिवसैनिक विनोद पाडर यांनी १३ मार्चला या रस्त्यावर लोटांगण आंदोलनाचा इशारा दिला होता. यानुसार त्यांनी शनिवारी सकाळी लोटांगण आंदोलन केले.

बोदवड ते साळसिंगी रस्त्यावरील मोठमोठ्या आकाराच्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे दूरच, साधे पायी देखील चालता येत नाही. याबाबत मध्यंतरी वाढलेली ओरड पहाता ठेकेदाराने मातीमिश्रित मुरूम टाकून थातूरमातूर दुरुस्ती केली. पण, त्याचा उपयोग झाला नाही. यामुळे विनोद पाडर यांनी शनिवारी बोदवड-साळसिंगी रस्त्यावर शारदा कॉलनीपासून पुढे ११ ते सव्वा अकरा या कालावधीत लोटांगण आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान, लोटांगण आंदोलनाची तीन दिवसात दखल न घेतल्यास आत्मदहन करू, असा इशारा पाडर यांनी दिला आहे.

आंदोलनस्थळी शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके, शांताराम कोळी, कलीम शेख, हर्षल बडगुजर, गोपाळ पाटील, अयुब कुरेशी, दीपक माळी, अतीश सारवान, सुवर्ण सिंग राजपूत, पवन माळी, सुनील वैद्य, पप्पू भांजा, भूषण भोई, मुकेश महाजन, समीर शेख उपस्थित होते.

Protected Content