नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांचा सायकलवरून प्रचार

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये सायकल रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. कधी रथात बसून, कधी बैलगाडी मधून प्रचार करणारे शांतीगिरी महाराज पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश देत सायकलवर बसून प्रचार करत आहेत. सायकलवरून प्रवास करत शांतीगिरी महाराजांनी आज नाशिकमध्ये प्रचार केला. शांतीगिरी महाराजांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपचे मोठे प्रयत्न सुरु होते.

माघार घेण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन मला भेटले होते, असे शांतीगिरी महाराजांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घालवून देणार होते. मात्र मी प्रचारात व्यस्थ असल्याने वेळेअभावी मी नरेंद्र यांना भेटू शकलो नाही. मात्र आता निवडणुकीतून माघार नाही, अशी स्पष्ट भूमिका शांतीगिरी महाराजांनी घेतली. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहे. नाशिक लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे.नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये सायकल रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. कधी रथात बसून, कधी बैलगाडी मधून प्रचार करणारे शांतीगिरी महाराज पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश देत सायकलवर बसून प्रचार करत आहेत. सायकलवरून प्रवास करत शांतीगिरी महाराजांनी आज नाशिकमध्ये प्रचार केला. शांतीगिरी महाराजांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपचे मोठे प्रयत्न सुरु होते.
माघार घेण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन मला भेटले होते, असे शांतीगिरी महाराजांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घालवून देणार होते. मात्र मी प्रचारात व्यस्थ असल्याने वेळेअभावी मी नरेंद्र यांना भेटू शकलो नाही. मात्र आता निवडणुकीतून माघार नाही, अशी स्पष्ट भूमिका शांतीगिरी महाराजांनी घेतली. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहे. नाशिक लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे.

Protected Content