पाचोरा तालुक्यातील १२ गणांच्या निवडणूकीचे आरक्षण जाहीर

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा पंचायत समितीच्या १२ गणांसाठीचे आरक्षण भडगाव रोडवरील अल्पबचन भवनात उपविभागीय डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखालीसोडतीद्वारे आरक्षण करण्यात आले.

 

याप्रसंगी  तहसिलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, अव्वल कारकून भरत पाटील, विस्तार अधिकारी राजकुमार धस, संजय देवकर बी. पी. बागुल यांनी आरक्षण सोडतीसाठी यांची उपस्थिती होती.

 

पाचोरा तालुक्यातील १२ गणांचे आरक्षण याप्रमाणे जाहीर झाले. 

लोहारा -अनुसूचित जाती, भोजे – अनुसूचित जमाती महिला राखीव,नगरदेवळा व तारखेडा इतरमागास प्रवर्गाच्या महिला राखीव, लोहटार – इतर मागासवर्ग, कुरंगी, शिंदाड व बाळद बु” गणासाठी सर्वसाधारण महिला राखीव, बांबरुड (राणीचे), पिंपळगाव (हरे.), जारगांव व कुऱ्हाड खु” या गणात सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

 

कुरंगी गण महिलांसाठी राखीव झाल्याने पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांची पंचाईत झाली आहे. त्यांना त्यांचे ऐवजी त्यांच्या अर्धानीस राजकारणात सक्रिय करावे लागणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी सभापती सुभाष ,बन्सीलाल पाटील, माजी सदस्य अनिल पाटील, शिवदास पाटील, ज्ञानेश्वर सोनार,परेश पाटील, सुनिल पाटील, राजेंद्र साळुंखे सह मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तै व इच्छुक उपस्थित होते. का

 

र्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी अतुल पाटील, सुत्रसंचलन तहसिलदार कैलास चावडे तर उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी मानले बुऱ्हाणी इंग्लिश स्कूलचा इयत्ता दुसरीत शिक्षण घेत असलेल्या वेदान्त प्रकाश चौधरी या विद्यार्थ्यांने आरक्षणाच्या चिठ्या काढल्या.

 

Protected Content