मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय प्रचार समितीत निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आज संसदीय बोर्ड समितीसह प्रचार समितीची फेररचना केली. यात संसदीय बोर्ड समितीतून नितीन गडकरी आणि शिवराजसिंग चौहान यांचे नाव वगळले असून त्यांच्या जागी बी. एस. येडियुरप्पा आणि सर्वानंद सोनवार यांची निवड करण्यात आली आहे. गडकरी हे मोदी-शाह यांच्या विरोधी गटातले ओळखले जात असल्याने त्यांचा पत्ता या समितीतून कट करण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय प्रचार समितीत स्थान देण्यात आले आहे. ही समिती अतिशय महत्वपूर्ण असल्याने यातील नियुक्तीमुळे फडणवीस यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे. तर गडकरी यांची दिल्ली दरबारातील पत घसरल्याची चर्चा देखील आता सुरू झाली आहे.