छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकांसाठी पक्षातील इच्छूक उमेदवार मतदारसंघात दौरे करत आहेत. आजवर कोणत्याही पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नव्हती.
राज्यातील विधानसभेच्या तयारीसाठी एमआयएमकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी एमआयमचे ५ उमेदवार आज जाहीर केले आहेत.
माजी खासदार इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच सोलापूर विधानसभा मतदारसंघातून फारुख शब्दी, मालेगाव येथून मुफ्ती इस्माईल, धुळे येथून फारुख शहा आणि मुंबईत फैयाज अहमद खान यांच्या नावाची घोषणा ओवैसी यांनी केली आहे. अन्य उमेदवारांची यादी नंतर जाहीर केली जाणार असल्याचे ओवैसी यांनी सांगितले आहे.