वरणगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शासकिय विश्राम गृह येथे भुसावळ तालुका कार्यकारणीची बैठक दि. ८ सप्टेंबर रविवार रोजी आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला जिल्हा अध्यक्षा नंदाताई भावटे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून ॲड .प्रविण इंगळे तसेच असंख्य महिला वर्ग व तरुण वर्गाने संघटनेत प्रवेश केला.
बैठकीच्या यशस्वितेसाठी भुसावळ तालुका अध्यक्षा निकिताताई भावटे, तालुका उपाध्यक्षा मनिषा लोखंडे,तालुका संपर्क प्रमुख मंदाताई सावळे यांनी परिश्रम घेतले. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम, प्रा. प्रकाश मोरे, महेंद्र महाले,सुकदेव सोनवणे, माया शंभरकर व इतर कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते .