यावल-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी | गणेशोत्सव विसर्जन व मुस्लीम बांधवांचे येणारे सण ईद -ए- मिलाद मिरवणूक संदर्भात येथील पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी आणि अडचणी संदर्भात आढावा घेत सर्व धर्मीयांनी मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी येथील पोलीस ठाण्याचे आवारात सोमवारी सकाळी शांतता समिती सदस्य व प्रतिष्ठितांची बैठक आयोजित केली होती .या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली गावातील सण, उत्सव , मिरवणुका ह्या सर्व सर्वधर्मीय प्रतिष्ठीतांच्या समोपचारातून व्हाव्यात असे मत पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी व्यक्त केले.
यावल शहरातील पाच दिवसीय गणेशोत्सव मिरवणुका सह ईद-ए-मिलाद मिरवणुकी संदर्भात येथील यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सोमवारी सकाळी येथील पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत बोलताना म्हणाले की शांतता समिती सदस्यांनी व प्रतिष्ठितांनी शहरातील शांतता कायम राखण्यासाठी युवा वर्गास समजावून अती उत्साहापासून रोखणे महत्त्वाचे आहे. हल्ली तरूण वर्ग जास्त उत्साही असतो. शहरातील मोहल्या- मोहल्यात तरूण वर्गाच्या ही बैठका घेणार असल्याचे सांगितले.
मिरवणुकीत ऐन वेळेवर एखाद्या विषयावर वाद होतात तेव्हा धावपळ होते असे होऊ नये म्हणून या बैठकीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले कोणत्याही समाजाची धार्मिक मिरवणूक असो ती धार्मिक पध्दतीनेच व्हावी जो चुकतो त्याचे समर्थन न करता त्यास समजावून सांगितले पाहिजे कारण एका मुळे वातावरण दुषीत होते. दोषींवर आम्ही कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.
पारंपरिक गणपती, दुर्गा मिरवणूक मार्ग, सार्वजनिक ठिकाणी झेंडे,बॅनर लावण्यासंदर्भात तसेच नगरपालिके च्या शहरातील समस्या बाबत अनास्था वर बैठकीत चांगलीच गरमा गरम चर्चा झाली अनेकांनी यावर खदखद व्यक्त करत यातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर सर्व धर्मीयांनी एकत्रित बसून चर्चा घडवून त्यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले. भगतसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.चर्चेत माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले,पुंडलिक बारी.भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार,असलम खान,गोपालसींग पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अमोल भिरूड यांनी चर्चेत भाग घेतला.