Home Cities जामनेर आचार्य गजाननराव गरुड पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात ; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आचार्य गजाननराव गरुड पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात ; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0
8


शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी येथील नामांकित आचार्य गजाननराव गरुड ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संस्थेचे प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर अहवाल वर्षात संस्थेशी संबंधित निधन पावलेल्या सभासद, हितचिंतक व मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत शेंदुर्णी नगरीतील सर्व शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पतसंस्थेच्या वतीने विशेष पारितोषिक, कौतुकपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

सभेच्या प्रास्ताविकामध्ये ज्येष्ठ सभासद सागरमल जैन यांनी संस्थेच्या गेल्या वर्षातील आर्थिक प्रगतीची, वाटचालीची व विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली. यानंतर संस्थेचे व्यवस्थापक विनोद चौधरी यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक ताळेबंदाचा लेखाजोखा सभासदांसमोर सादर केला. संस्थेने नोंदवलेला नफा आणि पारदर्शक कारभार याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी सभेस संस्थेचे ज्येष्ठ सभासद सागरमल जैन, सुधाकर बारी, प्रकाशराव देशमुख, अशोक जैन, लक्ष्मण गुजर, शांताराम गुजर, शिवराज गरुड, भगवान अहिरराव, खलील पठाण, विलास अहिरे यांच्यासह संचालक प्रदीप धनगर, विजय चौधरी, दिलीप पाटील, नितीन शिवपूजे, विठ्ठल गरुड, दिलीप वानखेडे, सौ. लता अहिरराव, मन्सूर पिंजारी आणि पतसंस्थेचे इतर सर्व सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सागरमल जैन यांनी केले तर आभार संचालक प्रदीप धनगर यांनी मानले.


Protected Content

Play sound