Home धर्म-समाज जेष्ठ पत्रकार विनोद दुवा यांची जीवनयात्रा समाप्त

जेष्ठ पत्रकार विनोद दुवा यांची जीवनयात्रा समाप्त

0
36


दिल्ली वृत्तसंस्था | चाळीशीहून अधिक पत्रकारतेचा अनुभव असलेल्या ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांची जीवनयात्रा समाप्त झाली आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांची कन्या मल्लिका दुवा यांनी दिली.

विनोद दुवा यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुवा यांनी एका समाजमाध्यमावर स्टोरी शेअर केली त्यात “असाधारण जीवन जगणाऱ्या एका निडर व असाधारण पित्याचं (विनोद दुवा यांचं) निधन झालं आहे. ४२ वर्षाच्या पत्रकारितेत ते सतत सत्याचाचं बाजूने राहिले” असा उल्लेख केला.

विनोद दुवा यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं. सर्वसामान्यांना समजेल अशाप्रकारे निवडणूकांचं विश्लेषणाला सुरुवात करणारे, रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पत्रकारितेतील रेड इंक पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित, पत्रकारितेत अनेकांचा आदर्श असलेले विनोद दुवा यांनी आज आपल्या आयुष्याच्या आर्टिकलला पूर्णविराम मिळालाय.


Protected Content

Play sound