खासगी बसने दोन भावंडांना उडविले : एक ठार, दुसरा गंभीर जखमी

जामनेर प्रतिनिधी | भरधाव वेगाने येणार्‍या खासगी बसने दोन भावंडांना दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चालक आणि क्लीनरला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आयान नसीब तडवी व त्याचा भाऊ रेहान नसीब तडवी हे दोघे देऊळगाव गुजरी येथील पळासखेडा काकर फाट्यावर खेळत होते. या वेळी बालाजी ट्रॅव्हल्सच्या धामणगावहून जामनेरकडे येणार्‍या एमएच-२१, बीएच- ०६४७ या क्रमांकाच्या बसने दोघा भावांना उडविले. या अपघातात आयान तडवी याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ रेहान तडवी हा गंभीर जखमी झाला आहे. या वेळी संतप्त झालेल्या जमावाने गाडीच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. पहूर स्थानकाचे पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन ड्रायव्हर आणि क्लीनरला अटक केली. हा अपघात शनिवारी सकाळी घडला.

या प्रकरणी वाहन चालक फहिमशाह मुश्ताक शाह व क्लिनर सरताज मकसूद शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून यातूनच हा अपघात घडला आहे. यामुळे अवैध वाहतुकीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!