सबज्युनियर राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ रवाना

जळगाव, प्रतिनिधी | अहमदनगर रोलबॉल असोसिएशन व महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ व्या सबज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगावच्या मुला – मुलींचा संघ श्रीरामपूर येथे रवाना झाला आहे.

 

१५ व्या सबज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन श्रीरामपूर येथे रविवार, दि. ५ डिसेंबर रोजी करण्यात आले असून या स्पर्धेसाठी जळगावचा मुला व मुलींचा संघ रवाना झाला आहे. यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे संघ सहभागी होत असून त्यात जळगाव जिल्ह्याचा संघ सहभागी होत आहे.

या संघाची निवड मेजर स्पोर्ट क्लब स्केटिंग क्लब येथे दि. २ डिसेंबर रोजी करण्यात आली. यात मुलांच्या संघांमध्ये अंकुर जैन, निशांत भोसले, प्रेम सोनवणे, मोहित पाटील, तन्मय कोपरकर, तास्क काळे, आदी चोरडिया, शशांक विद्यागर, रुद्र राणे या खेळाचा यांचा सहभाग असून मुलीच्या संघामध्ये सकिना मास्टर, नंदिनी विद्यागर, गौरी पिंगळे, कशीश ब्राह्मणे, समीक्षा महाले या खेळाडूंचा सहभाग आहे. संघाचे कोच म्हणून विशाल मोरे तसेच संघ व्यवस्थापक म्हणून प्रणव चौधरी व मंगेश कंखरे यांची निवड करण्यात आली आहे.

Protected Content