नोकरीच्या आमिषाने प्राध्यापकाची लाखो रूपयांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एम.कॉलेज परिसरातील प्राध्यापकाला नॅशनल युनिर्व्हसिटी सिंगापूर येथे नोकरीस लावून देण्याचे आमिष देत  १० लाख ८७ हजार ४८८ रुपयात फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, कांतीलाल पितांबर राणे (वय 49, रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, एम. जे. कॉलेज परिसर)  हे हैद्राबाद येथील के. एल. विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत.  १४ सप्टेबर २०२१ रोजी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन फोन आला. आम्ही प्लेसमेंटचे काम करतो, जगभरातील विविध देशांमध्ये असलेल्या नामांकीत विद्यापीठांमध्ये आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो, असे सांगितले. राणे यांना देखील परदेशात नोकरी करायची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस प्रतिसाद दिला. सिंगापूर विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या बहाण्याने या अनोळखी व्यक्तींनी राणेंकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने २९ जुलै २०२२ पर्यंत वेळोवेळी पैसे तब्बल 10 लाख 87 हजार 488 रुपये दिले.  यानंतरही राणे यांच्याकडे पैशांची मागणी सुरूच होती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच राणे यांनी दिलेले पैसे परत मागीतले. यानंतर अनोळखी व्यक्तींनी प्रतिसाद देण बंद केले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर राणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Protected Content