अमळनेर येथे आढळला अर्धवट जळालेला तरुणाचा मृतदेह

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर-टाकरखेडा रस्त्यावर एका ३० वर्षीय अनोळखी पुरूषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शेत शिवारातील ३८८ मध्ये ३१ मे ते २ जून दरम्यान एका ३० वर्षीय पुरूष जातीचा मृतदेह आढळून आल्याचे खळबळ उडाली आहे. दरम्यान हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सपोनि राकेश परदेशी, पोउनि राहूल लबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

मयताच्या अंगावर काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, लाल रंगाची अंडरवेअर, उजव्या हातावर ऊँ,दि.क.श.आ.वि असे नाव गोंदलेले आहे. ओळख पटल्यास किंवा मारेकऱ्यांची माहिती दिल्यास योग्य ते बक्षिस दिले जाईस अशी माहिती पोलीस प्रशासनातर्फे केले आहे. यासाठी अमळनेर पोलीस प ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.